महाराष्ट्र

राज्यात कोरोनाबाधितांनी गाठला नवा उच्चांक!

२ जुलै :- राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक निर्माण केला आहे. आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडत गेल्या 24 तासांत तब्बल 6330 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 186626 झाली आहे. तर फक्त मुंबईत 80,699 रुग्ण झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4689 जणांचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईत 1554 नवे रुग्ण आढळून आलेत. तर आज 8 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.