महाराष्ट्र

महावितरणावर संकटाच्या विळख्यात; उर्जामंत्र्यांची मोदी सरकारकडे मदतीची मागणी

2 जुलै :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून वाचण्याकरिता देशभर लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊनमुळे महावितरण मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री यांना आज पत्राद्वारे केली तत्काळ 10,000 कोटी रुपयांची मदत देण्याची विनंती केली आहे.

लॉकडाऊन काळात राज्यातील बहुतांश उद्योगधंदे व व्यवसाय बंद राहिल्यामुळे त्यातून मिळणारा महसूल ठप्प झाला आणि शेतीपंपाना व घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिल्याने प्रचंड आर्थिक तूट निर्माण झाली असल्याचे डॉ.राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.