अरे देवा; बीडमध्ये कोरोनाचं थैमान सुरु!
बीड :- (२ जुलै)
काल रात्री अचानक जिल्ह्याधिकाऱ्यांनी बीडमध्ये लागू केलेली संचारबंदी,आज बीड जिल्ह्यातून तपासणीकरिता पाठवण्यात आलेली सर्वाधिक १५८ संशयित व्यक्तींचे स्वॅब या सर्व गोष्टी पाहून आज बीडकर घरबसल्या चांगलेच चिंतेत होते. आणि अजून बीडकरांच्या चिंतेत भर पडली आहे. आताच बीड आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १५८ संशयित व्यक्तींच्या स्वॅबपैकी ४ स्वॅब पॉझिटिव्ह आले असून २ रुग्ण बीड शहरातील आहेत तर २ रुग्ण हि केज मधील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
बीडमध्ये कोरोनाचं थैमान सुरु झाल्याचे दिसून येत आहे. बीडकरांना आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे. दिवसरात्र बीडकरांच्या सेवेसाठी झटणाऱ्या प्रशासनाला बीडकरांच्या सहकार्याची गरज आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा… मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा… प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!
आज पाठविलेले स्वॅब – 159
निगेटिव्ह अहवाल – 155
*पॉजिटिव्ह अहवाल – 04
1) वय 37 पु, रा आसेफ नगर,बीड
2) वय 44 पु, रा अजीजपुरा,बीड
3) वय 38 पु ,रा भाटुंबा ता केज (औरंगाबादहुन आलेले)
4) वय 30 स्त्री, रा भाटुंबा ता केज (औरंगाबादहुन आलेले)