राजकारण

उदयनराजेंनी साधला अजित पवारांवर निशाणा!

 २ जुलै :- दिवसेंदिवस वाढत असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या चिंताजनक आहे. अशा भयाण परिस्थितीत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले शांतच होते. मात्र मागील दोन चार दिवसांपासून ते सक्रिय झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.गुरुवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपलं मत मांडले. आज खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

 उदयनराजे म्हणाले  लोकांमध्ये सध्य असंतोष असून तो फार काळ राहणे चांगला नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबद्दल मला अधिकृत माहिती दिली जात नाही. त्यांना वाटते माहिती कळाली तर आम्हाला दौरे पडतात त्यामुळे कोणाचे दौरे समजत नाही. पण आम्हालाही सर्व समजतं असा टोलाही त्यांनी लगावला.उदयनराजे पुढे म्हणाले, केंद्रातल्या आणि राज्यातल्या लोकांनी परिस्थिती समजून घेतली पाहिजे. लोकांची सहनशक्ती संपत आली असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे उद्रेक झाला तर कंट्रोल करता येणार नाही. केवळ कोरोनामुळेच मृत्यूच होतो असे नाही. त्यामुळे या भीतीखाली किती दिवस जगणार असा सवाल त्यांनी केला.सगळीकडे केवळ कोरोनाबद्दल चर्चा आहे इतर आजाराने जे बाधित आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होते आहे. कोरोना मुळे मृत्यू झाला तर शवविच्छेदन झाले पाहिजे.