सुशांत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींची होणार चौकशी
2 जुलै :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रय अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी केलेल्या आत्महत्येमुळे सुशांतचे चाहते अजूनही दुःखात आहेत. तर हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज चांगल्याच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सुशांतने आत्महत्या का केली याचा तपास पोलिस सध्या युद्ध पातळीवर करताना दिसत आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर तब्बल 30 जणांची चौकशी करण्यात आली. मात्र अद्यापही सुशांतनं आत्महत्या का केली याचे कारण मुंबई पोलिसांना सापडले नाही आहे.
करण जोहर सारख्या आघाडीच्या दिग्दर्शकावर टीका होत असताना आता डीसीपी प्रणय अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपट सुपरहिट देणाऱ्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळीचे नाव समोर आले असून आता संजय लीला भन्साळीची सुद्धा सुशांत आत्महत्या प्रकरणी चौकशी होणार आहे.सुशांतची काही व्यावसायिक दुश्मनी होती का हे देखील मुंबई पोलिसांकडून तपासले जात आहे.