महाराष्ट्र

रुग्णवाहिका चालकांचा होणार परवाना रद्द!

२ जुलै :-राज्यात कोरोनाच थैमान सुरु असताना राज्यभरातून रुग्णवाहिकांबाबत सतत तक्रारी येत आहेत. अर्धा किलोमीटरसाठी 5 ते 8 हजार रुपये आकारले जातात. त्यामुळे खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णवाहिकांनी प्रति किलोमीटर किती दर आकारायच्या त्याचा निर्णय त्या जिल्ह्यातील आरटीओ घेतील. त्यापेक्षा जास्त दर घेतला तर परवाना रद्द करण्याबरोबर गुन्हा दाखल केला जाईल.

ठरवलेल्या दरापेक्षा जास्त दर लावला तर लोक जिल्ह्याच्या हेल्पलाईनवर तक्रार करू शकतात अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.