बीड

चीनी ड्रॅगनची धकधक वाढली;भारताने उचललं सक्षम पाऊल!

२ जुलै :- भारत आणि चीन सीमा वाद सुरू असतानाच भारताने आपली संरक्षण क्षमता मजबूत करण्याचा निर्णय घेतला असून भारत सरकार एका नंतर एक सक्षम पाऊल उचलताना दिसत आहे. रशिया हा भारताचा सर्वात मोठा संरक्षण सामुग्री पुरवठादार देश आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे नुकतेच रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्या भेटीत त्यांनी या खेरदीविषयी बोलणी केली होती. सध्याचे धोके बघता भारताला हवाई दल आणखी मजबूत करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने एक मोठी योजना तयार केली होती.

भारत आणि रशियाकडून अत्याधुनिक MIG-29 ही विमानं खरेदी करणार आहे. त्यासाठी प्रस्तावही तयार करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून 12 एसयू-30 आणि 21 मिग-29 या श्रेणींची सुधारणांसह 33 नवीन लढाऊ विमाने घेणार आहे. संरक्षण मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ही खेरदी एकूण 18 हजार 148 कोटींची असेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.