News

एका क्षणात जमिनीखाली दबून 50 मजूरांचा मृत्यू,

काचिन, 02 जुलै : एकीकडे जगावर कोरोनाचं संकट असताना आता भूस्खलन सारखी आपत्ती काही देशांमध्ये येत आहे. म्यानमारमधील जेड खाणीत झालेल्या भूस्खलन तब्बल 50 लोकांचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर अनेक मजूर अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. देशाच्या अग्निशमन विभाग आणि सूचना मंत्रालयानं याबाबत माबिती दिली.

म्यानमारमधील काचिन राज्यातील जेड-समृद्ध हापाकांत क्षेत्रात शेकडो मजूर दगड फोडण्याचे काम करत होते. अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता अचानक भूस्खलन झाले आणि सर्व मजूर जमिनीखाली दबले गेले. अग्निशमन विभागानं याबाबत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली.

या पोस्टमध्ये असे सांगण्यात आले आहे ही सध्या 50 शव बाहेर काढण्यात यश आले आहे. सध्या बचाव कार्य सुरू असून, आणखी किती लोकं अडकले आहेत का, याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या भूस्खलनाचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की क्षणार्धात भूस्खलनमुळं मजूर जमिनीखाली दबले गेले. मुख्य म्हणजे या परिसरात पावसाळ्यात भूस्खलन होत असते, याआधीही असे प्रकार घडले आहे, तरी या खाणींमध्ये मजूर का काम करतात, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.