बीड

गॅस सिलिंडरचे दर वाढले!

2 जुलै :-एकीकडे कोरोनाचं वाढतं थैमान काही केल्या आटोक्यात येईना आणि दुसरीकडे गगनाला भिडलेला इंधन भाव काही कमी होईना. आहे.जुलै महिन्याच्या सुरवातीलाच सर्वसामान्य माणसास चांगलाच झटका बसला आहे.पेट्रोल डिझेलचे दर स्थिर राहिल्यानं काहीसा दिलासा मिळाला असं वाटत असतानाच बुधवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत.

देशातील तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या अनुदानाशिवाय किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. 14.2 किलो विना अनुदानित LPG सिलिंडरची किंमत दिल्लीत 1 रुपये प्रति सिलिंडर महाग झाली आहे. आता नवीन दर 594 रुपयांवर पोहोचले आहेत. अन्य शहरांमध्येही आजपासून घरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.