मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं
१ जुलै :- राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वारकरी संप्रदाय आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर जाऊ शकला नाही.अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री स्वतः पंढरपूरला दर्शनाकरिता गेले आहेत. मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं घातलं आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.