प्रियंका गांधींना नोटीस
1 जुलै : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांना 1 ऑगस्टपर्यंत लोधी इस्टेट येथील बंगला रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने पाठविलेल्या नोटीसनुसार प्रियंका गांधी 1 ऑगस्टनंतर या बंगल्यात राहू शकत नाहीत.
नोटीसमध्ये म्हटले आहे की, प्रियंका गांधींची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. या प्रणालीनुसार ज्यांना या प्रकारचं संरक्षण देण्यात येतं, त्यांना शासकीय निवास व्यवस्था दिली जात नाही. अशा परिस्थितीत प्रियंका गांधींना लवकरच बंगला रिकामा करावा लागू शकतो.