ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!
१ जुलै :- राज्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या वाढत्या संख्येचा आलेख पाहून ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचा तक्रारी येत होत्या. केवळ रुग्णालयात नेण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने कित्येक तास रुग्णांना ताटकळत राहावं लागत होतं. आता यावर उपाय म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने सगळ्या खासगी रुग्णवाहिका ताब्यात घ्यायचा निर्णय घेतला आहे. आता रुग्णवाहिकांचा दर सरकार ठरवणार आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आदेश काढण्यात आला आहे.