राजकारण

चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला

1 जुलै : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच आलेखचित्र पाहून राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णया विरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तोंड खोलून टीका केली आहे.

‘महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनःश्च हरि ओम झाले पाहिजे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त दोन किमी पर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे’ असा टोला पाटील यांनी लगावला आहे.’राज्य सरकारने काय ते एकदा ठरवावे, अर्थचक्र फिरवायचे का दोन किमीमध्येच फिरायचे, तातडीने निर्णय घ्या जनतेचा संभ्रम दूर करा’ अशी मागणीही पाटील यांनी केली.