मोदींनी उडवलं चायनीज App!
३० जून :- भारत -चीन सीमावाद सुरु असताना केंद्र सरकारने चीनची ५९ अँप्स बॅन करण्याचा निर्णय घेतला.भारतीय नागरिकांनी सुद्धा चिनी वस्तूवर,चिनी अँप्स वर भहिष्कार टाकण्यास सुरवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आपल्या मोबाईलमधून चायनीज अँप्स उडवली आहेत.चीनचं ट्विटर समजल्या जाणाऱ्या वेईबोवर पंतप्रधान मोदींचं अकाउंट होतं. आता हे अकाउंट सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून त्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. त्याच बरोबर आत्तापर्यंतचे बहुतांश ट्विट्स डिलिटही केले आहेत.