Popular News

चीनने सीमेवर तैनात केले 20 हजार जवान!

30 जून: भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला सीमा वाद निवळण्याचं सध्यातरी चित्र दिसत नाही. दोन्ही देशांची सीमा वादावर बोलणी सुरू असतानाच चीनने सीमेवर तब्बल 20 हजार सैनिक तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे सैनिक सीमेजवळच्या तळांवर असून कमीत कमी वेळात प्रत्यक्ष LAC जवळ जाता येईल अशा परिस्थितीत ते आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. भारताचीही चीनच्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर असून लष्करानेही सगळी तयारी केली आहे.