भारतीयांना पाहीजे आता चिंगारी!
१ जुलै :- भारत-चीन वादानंतर केंद्राने भारतात टिकटॉक अँपसह 59 अँपवर बंदी घातल्यानंतर भारतीय App चिंगारी ट्रेंडींगवर आलं आहे. अडीच मिलियनहून जास्त युजर्सने हे अँप आतापर्यंत डाऊनलोड केलं आहे.नवनवी सोशल प्लॅटफॉर्म्स ही युजर्सला आकर्षित करताना दिसून येत आहेत. भारत सरकारने टिकटॉक, हेलोसह 59 चिनी मोबाईल अँप्सवर बंदी घातली आहे, याच पार्श्वभूमीवर टिकटॉक युजर्सने वाट धरली आहे ती चिंगारी app ची.
सध्या चिंगारी app चे तासाला 1 लाखांहून अधिक डाऊनलोड्स हे होत आहेत तर आत्तापर्यंत एकूण 50 लाखाहून आधिक डाऊनलोड केलं गेलं आहे.चिंगारी एप इंग्रजीसह 9 भाषांमध्ये उपलब्ध आहे.. हिंदी, बांग्ला, गुजराती, मराठी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तमिळ आणि तेलगूतही व्हिडीओ करणं शक्य आहे.