बीड

बीडमध्ये कोरोनाचं मीटर सुरु!

बीड-जिल्ह्यात काल थांबलेलं कोरोनाचं मीटर आज पुन्हा सुरु झाले आहे. आज सकाळी पाठवण्यात आलेल्या 54 स्वॅब पैकी 48 स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे .धक्कदायक बाब म्हणजे ज्या 3 स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत ते तिन्ही व्यक्ती बीड शहरातील आहेत. 1 – 29वर्षे महिला – रा.अजीजपुरा, बीड,1 – 48वर्षे पुरूष – रा. जुना बाजार,बीड आणि 1 – 66वर्षे महिला, रा.कारंजा रोड, बीड या भागात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. बीडकरांना आता खबरदारीच्या राहणे अत्यावश्यक आहे.


आज पाठविलेले स्वॅब – 54
*निगेटिव्ह अहवाल – 48
*पॉजिटिव्ह अहवाल – 03
इंकाँक्लुसिव्ह अहवाल-01
रिजेक्ट अहवाल-०२
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!