१ जुलै :- पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर मुंबईत हाय अलर्ट घोषित केला आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील 191 ठिकाणी नाकाबंदी वाढवली आहे. याशिवाय मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वाची सरकारी आणि बिगर सरकारी ठिकाणांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी इंटरपोल आणि आयबीआयच्या मदतीने पाकिस्तानकडून या कॉल आणि कॉलरची संपूर्ण माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. आपण लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी असल्याचं फोनवरुन धमकी देणाऱ्याने सांगितलं होतं. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा कॉल पाकिस्तानमधून केला असून त्याची ओळखही पटली आहे. देशाच्या गुप्तचर संस्थेच्या मदतीने या कॉलरबद्दल मिळालेल्या माहितीच व्हेरिफिकेशन करण्याचं काम सुरु आहे.
Related