विवाहित तरुणीची गळा चिरून हत्या
१ जुलै : – एकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना गाडली आहे.मंगळवारी जालना जिल्ह्यातील मंठा शहरातील बाजार पट्ट्यात वैष्णवी इंगळे (वय 19) नाव असलेली विवाहित तरुणी आपल्या मैत्रिणीसह खरेदीसाठी गेली होती. साधारण चार वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या आरोपीने धारदार चाकूने हल्ला करत तरुणीचा गळा चिरला. बेसावध असलेली तरुणी जागीच कोसळली मैत्रिणीने मदतीसाठी आरडाओरड केली. दरम्यान, तरुणीचा जागीच मृत्यू झाला.पाच दिवसांपूर्वी या तरुणीचा विवाह झाला होता.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत याप्रकरणी तपास सुरु केला. प्रत्यक्षदर्शींच्या महितीनुसार, मृत तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तिच्याच घराजवळ राहणाऱ्या शेख अल्ताफ शेख बाबू या 26 वर्षाच्या तरुणाचे नाव पुढे आले. तरुणाची माहिती घेऊन त्याची शोधाशोध सुरु केली. संध्याकाळी एका शेतात लपून बसलेल्या या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. सदर आरोपीच्या ताब्यातून एक चाकू देखील पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान अटकेच्या भीतीने आरोपीने विष प्राशन केले असून त्याच्यावर जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची तब्येत स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.