उदयनराजेंचा केंद्राला सल्ला!
१ जुलै :- दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोना संक्रमणास आटोक्यात आणण्यासाठी देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.यावर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी टीका केलीय. लॉकडाऊन कधी उठणार? लॉकडाऊन काढला नाही तर लोक गप्प बसणार नाही, किती दिवस अन्यधान्य पुरवणार? असा सल्लाही उदयनराजे भोसले यांनी केंद्राला दिलाय. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी एकत्र येऊन चर्चा करुन लॉकडाऊन उठवण्याविषयी निर्णय घ्यावा, असंही ते म्हणाले.लॉकडाऊनमुळे लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन किती दिवस वाढवणार? असा प्रश्न माजी खासदार उदयनराजे यांनी राज्यासह केंद्राला विचारला आहे. कोरोना विषाणू संसर्गासाठी पर्याय आयुर्वेद आहे. होमियोपॅथीने कोणताही आजार बरा होता. मी यांचा प्रचार करत नाही. वस्तुस्थिती आहे ती सांगतोय. पूर्वीच्या काळात अॅलोपॅथी नव्हती, त्यावेळी झाडपाल्यांच्या औषधांचा वापर केला जात होता. जे गुणकारी आहेत. दरम्यान, स्विडीन देशाने ज्या प्रमाणे हर्ड इम्युनिटीचा प्रयोग केला. तसाच प्रयोग आपण भारतात केला पाहिजे, असेही उदयनराजे म्हणाले.