बीड

चीनला चहुबाजूने वेढलं! आता ऑस्ट्रेलियन सैन्यानेही केला घेराव सुरू

कॅनबेरा, 1 जुलै : चीनची आक्रमक वृत्ती, सायबर हल्ले आणि आर्थिक वेढा यामुळे त्रस्त असलेल्या ऑस्ट्रेलियाने आता चीनविरुद्ध सैन्य उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे की आता ते इंडो-पॅसिफिक प्रदेशात आपले सैन्य बळकट करेल आणि चीनला धडा शिकवण्यासाठी नेहमी सज्ज असेल.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बुधवारी सांगितले की,  सैन्य अधिक मजबूत करण्यासाठी शस्त्रे खरेदी केली जातील आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशातील ऑस्ट्रेलियाने अनेक महत्त्वपूर्व भागांमध्ये सैन्य आणि शस्त्र तैनात करणार आहे.

पीएम मॉरिसन यांनी बुधवारी जाहीर केले की, चीनच्या कोणत्याही धमकीमुळे आपण घाबरणार नाही. यासाठी ऑस्ट्रेलियाने 270 अब्ज डॉलर्स संरक्षण खरेदी योजना आणली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले की, ऑस्ट्रेलिया सुपर-हॉरनेट लढाऊ विमानांचा ताफा मजबूत करण्यासाठी देशातील लांब पल्ल्याच्या अँटी-शिप क्षेपणास्त्रांची खरेदी करण्याच्या आणि देशाच्या संरक्षण धोरणात बदल करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सहयोगी आणि मुख्य भूमीच्या संरक्षणासाठी ऑस्ट्रेलियाने असे पाऊल उचलले आहे.

दरम्यान भारत आणि चीन यांच्यात 15 ते 16 जून दरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये कमांडर स्तरावर (Corps Commander Level) चर्चा झाली. मात्र या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये याआधीही चर्चा झाली होती. त्यावेळी चीनने या चर्चेनंतर गलवान खोऱ्या जवळील LAC मधील काही भागांतून आपले सैन्य मागे घेण्याचे मान्य केले आहे, परंतु अद्याप पॅंगोंग लेक चीनने चर्चा केली नाही आहे.