अबब…! 103 वर्षांच्या आजोबांचा कोरोनावर विजय
३० जून :- देशभर सध्या कोरोनाचं थैमान सुरु असले तरी सध्या प्रत्येक देशवासियस आनंद पोहोचणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे जीवघेण्या कोरोना रोगातून मुक्त होत असलेली वाढती संख्या.भारतातील सर्वात वयोवृद्ध कोरोना रुग्णाने कोरोनाला हरवलं आहे.103 वर्षांच्या व्यक्तीने कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे.सुखा सिंह छाबरा असं या व्यक्तीचं नाव आहे.त्यांना ताप आला होता आणि श्वास घेण्यात त्रास होत होता.त्यामुळे 2 जूनला त्यांना ठाण्यातील कौशल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली.ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं.यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.सुखा सिंह यांचं वय पाहता त्यांना सुरुवातीला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. मात्र 14 दिवसांतच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. सुखा सिंह यांच्यावर 24 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.