महाराष्ट्र

राज्याची कोरोनासंख्या फ्रान्सपेक्षाही जास्त!

३० जून:- दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या एक दिवसाची संख्या थोडी कमी झाल्यासारखं वाटत असतानाच महाराष्ट्राचा एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा पावणेदोन लाखांपर्यंत पोहोचला आहे.गेल्या 24 तासांत राज्यात नवे 4878 रुग्ण दाखल झाले आहेत.पण त्याच वेळी बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत 174761 पैकी 90,911 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. फ्रान्ससारख्या एकेकाळच्या कोरोना हॉटस्पॉटपेक्षा जास्त रुग्ण आज फक्त राज्यातच निघाले आहेत. महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदर भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही जास्तच आहे. गेल्या 48 तासांत 95 तर आधीच्या काही दिवसांतले मिळून 150 असे 245 कोरोना मृत्यू आज राज्यात झाले आहेत.गेले काही दिवस दररोज किमान पाच हजारांची रुग्णवाढ होत आहे. आज दिवसभरात 1951 रुग्णांना बरं होऊन डिस्चार्ज देण्यात आला.त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेटसुद्धा थोडासा सुधारला आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!