Popular News

चीनी ड्रॅगन संतापला!

३० जून :- भारत-चीन सीमारेषेवरील तणाव अद्याप निवळण्याचं नाव घेत नाही.चीनचे भारता विरोधात निरनिराळे गेम प्लॅन सुरु असताना भारतात चीनी साहित्य, ५९ अँपवर आणि अनेक वस्तूंवर नागरिक आणि प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.सायबर हल्ल्यापासून ते सीमेवर होऊ शकणाऱ्या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी भारत चांगलाच सज्ज झाला आहे.यामुळे आता चीनच्या मानसुब्यांना चांगलीच ठेस पोहचली आहे.भारतात चीनी साहित्य, ५९ अँपवर आणि अनेक वस्तूंवर बंदी घातल्या नंतर चीनी ड्रॅगन चांगलाच संतापला आहे.भारताने घेतलेल्या या कठोर निर्णयानंतर “भारत अमेरिकेची नक्कल करत आहे. चीनी वस्तू, अँपवर बहिष्कार घालण्यासाठी भारत अमेरिकेसारख्या सबबी शोधत असल्याचं: चीन मीडियाने म्हटलं आहे.