बीड

देवा तुलाच काळजी! कोरोनाचे मीटर डाऊन

बीड :- जिल्हयातील आज एकूण 104 संशयित व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.या 104 संशयित व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अहवाल आले असून सर्व व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.104 संशयित व्यक्तींच्या स्वॅब रिपोर्टकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते आणि सर्व बीड जिल्हावासी चिंतेत होते.मात्र या सुखद बातमीमुळे बीड जिल्हयात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.
१) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 20
2)CCC बीड 62
2) ग्रामीण रुग्णालय आष्टी 12
3) उपजिल्हा रुग्णालय केज 07
4)स्वाराती ग्रा वै महाविद्यालय आंबाजोगाई 03
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!