महाराष्ट्र

कोरोनाची भीती वाढली;शिक्षकाने आत्महत्या केली!

३० जून:- कोरोनाचा कहर आता इतका वाढला आहे की आता कोरोना होण्याअगोदरच कोरोनाच्या भीतीने माणसांचा जीव जात आहे.कोरोना रुग्णांच्या वाढत्या आलेखामुळे घरात बसून माणसांचे मानसिक संतुलन बिघडत असून मनोवृत्ती विक्षिप्त होत चालली आहे.रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही कोरोनाच्या भीतीनं शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची बातमी आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील शेंद्रे रोडवरील चंद्रशेखर तळवार या शिक्षकाने तब्येत खालावल्याने कोरोनाची चाचणी केली असता अहवाल नेगिटिव्ह आला पण तरीदेखील भीतीमुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं.या घटनेने सभोतालील परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.