बीड

बीड-कोरोनाने घेतला आणखी एक बळी

बीड-(दि.३० जून) बीड जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा चांगलाच कहर सुरु झाला आहे.आंबेजोगाई येथील स्व.रा.ती. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका २८ वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातून हा २८ वर्षीय तरुण भावाकडे आला होता.यानंतर हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते.रुग्णालयात उपचार दरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!