इंदुरीकर समर्थक झाले आक्रमक!
३० जून :- प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची 3 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.त्याआधीच इंदुरीकर समर्थक आक्रमक झाले असून गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे.इंदुरीकर समर्थक आता आक्रमक झाले आहे. आज इंदुरीकर समर्थकांनी संगमनेर तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे. इंदुरीकर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. जर इंदुरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घेण्यात आला नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही समर्थकांनी दिला आहे.