महाराष्ट्र

पालकमंत्र्यांकडून लॉकडाऊनची घोषणा!

30 जून :- दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या चिंताजनक संख्येमुळे प्रशासनाच्या नाकी नऊ आले असून नागरिक देखील त्रस्त झाले आहेत.कोरोनाच्या वाढत्या संक्रमणापासून बचावाकरिता नाशिक मध्ये सायंकाळी 7 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू अधिक कडक करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजेनंतर विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.नाशिकमध्येही लॉकडाऊन होणार का असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. याबाबत शहरात वेगवेगळया चर्चा सुरू आहेत.याच पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शासकिय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर बोलतांना भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात 4 हजारहून अधिक रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात 103 रूग्णांची प्रकृती गंभीर आहे.जिल्हयात आतापर्यंत कोरोना आजाराने 236 जणांचा मृत्यू झाला यात 99 मृत्यू नाशिक शहरात झाले. यातील 136 लोकांचे वयोमान हे 40 ते 45 वर्ष वयोगटातील असून तरूणांचा मृत्युदर 60 टक्के असल्याने ही गंभीर बाब आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे.नाशिकमध्ये कोरोनाचं संकट वाढल्यामुळेच लॉकडाऊन आणखी कडक करण्याची पालकमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आली आहे.