पालख्या पंढरपूरकडे रवाना
३० जून :- जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील आज ऐतिहासिक क्षण पार पडला. इतिहासात पहिल्यांदाच तुकाराम महाराजांच्या पादुका या एसटीतून पंढरीच्या दिशेने रवाना झाल्या. आज संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने रवाना झाल्यात.पंचपदी अर्थात पाच भजन झाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या पादुका मंदिराच्या मुख्य सभा मंडपातून बाहेर पडल्या. मग मंदिराला प्रदक्षिणा घालून पादुका विठाई बसच्या पहिल्या बाकावर विराजमान झाल्या. तर आळंदी पालखी सोहळ्याचे 20 मानकरी या बसमधून माऊलींच्या पादुका घेऊन बसमधून रवाना झाले.