मुंबईमध्ये पुन्हा होणार दहशतवादी हल्ला?
३० जून :- देशात कोरोनाचा कहर सुरु असताना आता मध्येच भारताचा विरोधक असणाऱ्या पाकिस्तान देशातून कराची स्टॉक एक्सचेंजच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन आला असून हा फोन पाकिस्तानमधून ताज हॉटेलमध्ये करण्यात आला होता. फोनवर एक व्यक्ती बोलत होता. ती व्यक्ती म्हणाली की, ‘कराची स्टॉक एक्सेंजमध्ये झालेला दहशतवादी हल्ला सर्वांनीच पाहिला. आता ताज हॉटेलमध्ये 26/11 सारखा हल्ला पुन्हा एकदा होणार.ज हॉटेल व्यवस्थापनाकडून लगेचच मुंबई पोलिसांनी यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर ताज हॉटेल बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रात्रभर मुंबई पोलीस आणि हॉटेल स्टाफ यांनी मिळून सुरक्षेची पाहणी केली. हॉटेलमध्ये येणारे गेस्ट आणि त्यांच्या हालचालींवरही नजर ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त दक्षिण मुंबई आणि किनारपट्टीवरील गस्त आणि सुरक्षा वाढवण्यात आली आहे.