पतंजलीने घेतला यू-टर्न!
३० जून :- अवघ्या जगभरात कहर घातलेल्या कोरोना विषाणूंवर मात करण्यासाठी प्रभावी लस तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असताना देशातील योग गुरु म्हणून लोकप्रिय असणारे बाबा रामदेव यांनी कोरोनावर मात करण्याकरिता कोरोना व्हायरसवरील ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध लॉन्च करून प्रभावी औषध तयार केले असल्याचा दावा करत मोठा गाजा-वजा केला होता.त्यानंतर अनेक या औषधावरून अनेक वाद निर्माण झाले होते. अशातच पतंजली योग पिठाने आपल्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे. कोरोनिल हे औषध उपचारासाठी नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं असल्याचं पतंजलीकडून सांगण्यात आलं आहे.’क्लिनिकल ट्रायल केल्यानंतर जो निष्कर्ष आला तो आम्ही संपूर्ण देशाला सांगितला. आम्ही असं म्हणालो नाही की, हे औषध कोरोनावर उपचार म्हणून वापरलं जाऊ शकतं. आम्ही असं म्हणालो होतो की, या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल दरम्यान, कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. यामध्ये काहीच शंका घेण्यासारखं नाही.”अनेकांचं असं म्हणणं आहे की, क्लिनिकल ट्रायल खोटं आहे. कोणी म्हणतयं आम्ही केलेला दावा खोटा आहे. आम्ही कधीच नाही म्हमालो की, आम्ही कोरोनाचं औषध तयार केलं आहे. आम्ही हे म्हणालो की, ‘आम्ही तयार केलेल्या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत.’