बीड

तोंडाला मास्क लावा .. अन्यथा १ हजार रुपये दंड भरा!

३० जून :- दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा राज्यात वाढत चालला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमांपासून स्वतःचा आणि इतरांचा बचाव करण्याकरिता मास्क लावणे अत्यावश्यक आहे. मात्र अनेक नागरिक तोंडाला मास्क लावत नसून रस्त्यावर,सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र निष्काळजीपणे मोकाट फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांच्या अशा बेशिस्त वागण्याने कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणास आमंत्रण दिल्यागत आहे.येणाऱ्या काळात कोरोनारूपी मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. याच पार्शवभूमीवर प्रशासनाने आता या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार, कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. असे मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे