जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवले सक्तीच्या रजेवर!
३० जून :- कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सकांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात झालेल्या औषध खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बोल्डे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी केली आहे.बोल्डे यांच्यासह आणखी देखील काही कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे.