धक्कादायक;सॅनिटायझरमुळे एका व्यक्तीचा मृत्यू!
३० जून :- कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मृत्यू होत असताना,नैराश्यातून आत्महत्या घडत असताना आज आगळी-वेगळी धक्कादायक घटना घडली आहे.नागपूर महानगरपालिकेत सफाई कर्मचारी असणारे मद्यपी गौतम गोस्वामी यांनी दारूकरिता पसे नसल्याने कुटुंबीयांचे लक्ष नसताना घरातीलच असलेल्या हॅण्ड सॅनिटायझरच्या बॉटल मधून सॅनिटायझर प्राशन केले. त्यानंतर संध्याकाळी त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेव्हा उपचारानंतर काही तासांनी बरे वाटल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. त्यानंतर त्यांना मेयो सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पहिल्यांदा तब्येत बिघडल्यानंतर दरम्यानच्या काळात गौतम यांनी पुन्हा सॅनिटायझर प्राशन केले असावे आणि त्यामुळेच त्यांची प्रकृती खालावली असावी अशी शंका व्यक्त होत आहे. कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गौतम गोस्वामी यांच्या मृत्यू प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.