Popular News

नरेंद्र मोदींनी केली गरजवंतांसाठी मोठी घोषणा!

३० जून :- देशात भरात अनलॉक-2 लागू झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांशी आज संवाद साधला.सध्या सुरु असणाऱ्या पावसाळ्यात आपल्याला कोरोनाशी आणखी तगडा संघर्ष करायचा आहे. सर्वांना काळजी घेत कोरोनाशी झुंज द्यायची आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन नागरिकांनी योग्य पद्धतीने केल्याने भारतात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला.पण अनलॉक-1 मध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा वाढताना दिलसा आहे, ही बाब चिंताजनक आहे. देशाचा पंतप्रधान असो किंवा सामान्य नागरिक सर्वांना नियम एकसारखे आहेत.गरीब कल्याण अन्न योजना दिवाळीपर्यंत सुरु राहणार असल्याची मोठी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. देशातील एकही व्यक्ती उपाशी राहिला नाही पाहिजे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी नागरिकांना पाच किलो गहू किंवा तांदूळ तसेच एक किलो चणा मिळणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारात 90 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे. यामध्ये मागील तीन महिन्यांचा खर्च जोडला तर हा खर्च दीड लाख कोटींच्या घरात जातो.पुढे पंतप्रधान म्हणाले की वन नेशन वन रेशन कार्डचा सर्वात मोठा फायदा गरीब लोकांना होईल, जे पोटापाण्यासाठी आपलं गाव सोडून इतरत्र नोकरीसाठी जातात.अशा गरजवंताला उपयुक्त असणाऱ्या अनेक मोठ्या घोषणा करत अनेक उपयुक्त आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.