News

आमीर खानच्या घरी पोहोचला कोरोना, आईचीही करणार COVID-19 चाचणी

मुंबई, 30 जून : राज्यामध्ये  कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढू लागला आहे. मुंबईत तर कोरोनाचा कहर झालेला पाहायला मिळतो आहे. राज्यात लॉकडाउन (Lockdown) शिथिल केल्यानंतर काही भागात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकं वर काढलं. विषाणू संसर्ग बाधीत रुग्णं वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आता मुंबईत विनाकारण येणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाचा धोका आता जवळपास सर्वांजवळ येऊन ठेपला आहे. अभिनेता आमीर खान (Aamir Khan)चे काही स्टाफ मेंबर देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

सोशल मीडियावर आमीरने यासंदर्भात माहिती दिली आहे. आमीर खान स्वत:, त्याचे कुटुंबीय आणि काही स्टाफ मेंबर्सची चाचणी नेगिटिव्ह आली आहे. मात्र त्याच्या आईची टेस्ट करणे अजून बाकी आहे. त्यामुळे आमीरने त्याच्या स्टेटमेंटमध्ये चाहत्यांना म्हटले आहे की, त्यांनी त्याच्या आईचा रिपोर्ट देखील नेगिटिव्ह यावा यासाठी प्रार्थना करावी.

आमीर खानने त्याच्या स्टेटमेंटमधून अशी माहिती दिली आहे की, पॉझिटिव्ह आलेल्या स्टाफ मेंबरर्सना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याने वैद्यकीय मदतीसाठी बीएमसी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे त्याने कोकिलाबेन हॉस्पीटलचे देखील आभार मानले आहेत.

सोशल मीडियावर आमीरच्या या ट्वीटनंतर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या आईचे अहवाल निगेटिव्ह यावेत यासाठी देखील अनेकांनी प्रार्थना केली आहे.