Popular News

सुशांत आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

२८ जून :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आघाडीचा अभिनेता सुशांत राजपूत याने राहत्या घरी गळफास लावून स्वतःची जीवनयात्रा संपवल्याने सुशांतच्या चाहते अजूनही शोकात आहेत.सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा खोलवर आणि बारकाईने तपास सुरु आहे.सुशांत जवळीक अनेक जणांची पोलीसांकडून चौकशी अजूनही सुरु आहे.सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यानंच झाला असल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालेलं आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणी आता आणखी एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे.सुशांतनं ज्या बेडरुममध्ये आत्महत्या केली त्या बेडरुममध्ये पोलिसांना त्याच्या बाथ रोबचे काही तुकडे मिळाले आहेत.सुशांतनं बाथ रोबच्या बेल्टच्या साहाय्यानं गळफास लावण्याचा प्रयत्न केला होता. पण तो बाथरोबचा बेल्ट तुटला. त्यामुळं त्यानं कपाटातून त्याचा हिरव्या रंगाचा कुर्ता काढला आणि गळफास लावून घेतला. असा खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिस जेव्हा सुशांतच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या बहिणीनं आणि मित्रानं तो हिरवा कुर्ता कात्रीनं कापून त्याचा मृतदेह खाली उतरवला होता. असंही पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच त्यानं फास लावून घेतलेल्या हिरव्या रंगाचा कुर्ता देखील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला असून त्यामध्ये सुशांतचं व्यक्तीचं वजन उचलण्याची क्षमता होती की नाही,हे पडताळून पाहता येणार असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.