तापसी पन्नूला बसला ‘शॉक’
२८ जून :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय असणारी आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नूला ३ महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आलेले विजेचे बिल पाहून चक्क शॉक बसला आहे.सर्वसामान्य नागरिकांना भरमसाठ बिल आल्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत.तापसी पन्नू विविध विषयांवर आपली भूमिका ठामपणे नेहमीच मांडत असते.एका ट्वीटमुळे तापसी पन्नू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने लॉकडाऊनदरम्यान तिला आलेल्या बिलांवरून नाराजी व्यक्त केली आहे. तापसीने ट्वीट करुन तिला आलेले विजेचं बिल शेअर केलं आहे.तापसीने ट्वीट करुन म्हटलं की, “लॉकडाऊनला आता तीन महिने झाले आहेत. मी आता हाच विचार करत आहे की गेल्या महिन्यात मी असं कोणतं विद्युत उपकरण घरात लावलं की माझं वीज बिल एवढं वाढलं.” ट्वीट करताना तापसीने अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईला टॅग करत विचारलं की, “असं तुम्ही किती चार्ज करता?”