राजकारण

राज्यात आजही रुग्णवाढीचा उच्चांक!

28 जून: डोळ्यांना न दिसणाऱ्या जीवघेण्या कोरोना नावाच्या सूक्ष्म विषाणूने सर्व जगाला आपल्या तालावर नाचवले आहे.जिकडे पाहावं तिकडे फक्त कोरोनाचा कहर सुरु आहे.राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झापाट्याने वाढ होत आहे.आज आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत निघाले असून 24 तासांमध्ये तब्बल 5493 रुग्णांची वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 64 हजार 626 वर गेला आहे. तर आज 156 जणांच्या मृत्यची नोंद झाली. त्यामुळे मृत्यूचा आकडा 7429 वर गेला आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!