तलावात उडी मारुन तरुणाची आत्महत्या
२८ जून :- कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे मुक्त संचार करता येत नाही.त्यामुळे संसाराचा गाडा पूढे ढकलण्याकरिता पैसे कमावता येत नाही.मात्र उदर्निर्वाहाकरिता अत्यावश्यक असतो तो म्हणजे पैसा.आणि हाच पैसा सध्य परिस्थितीमध्ये कमावणे कठीण झाले आहे.यामुळे सर्व सामान्य माणसास अनंत आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.अर्थिक अडचणींचा सामना करताना जी हलक्या काळजाची माणसं असमर्थ ठरत आहेत ती माणसं आयुष्यातील वाढत्या नैराश्यास वैतागून जीवनयात्रा संपवत आहेत.भोपाळ येथे एका तरुणाने वैयक्तिक कर्ज घेतले होते, मात्र लॉकडाऊनमध्ये काम बंद झाल्याने लॉकडाऊन दरम्यान हप्ता जमा न केल्याने व्याज वाढू लागले आणि तरूण नैराश्यात आला होता. कुटुंबीयांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्या तरूणाने धक्कादायक पाऊल उचलले आणि मोठ्या तलावात उडी मारून आत्महत्या केली.या युवकाचा मृतदेह व्हिआयपी रोडवरील मोठ्या तलावातून येथून काढण्यात आला आहे. गोताखोरांनी एका तरूणाने तलावात उडी मारल्याचे सांगितले. गोताखोरांच्या पथकाने तलावामध्ये अनेक तास शोध घेतल्यानंतर त्या तरूणाचा मृतदेह बाहेर काढला. तलैया पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामाच्या कारवाईनंतर शव पोस्टमॉर्टमसाठी हमीदिया रुग्णालयात नेण्यात आला.