महाराष्ट्र

चिंतेत आणखी भर; सर्व हॉस्पिटल फुल्ल

28 जून: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांत 1200 हून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. शहरातील या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नाशिक शहरातील खासगी तसेच सरकारी रुग्णालये रुग्णांनी अक्षरश: हाऊस फुल्ल झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अतिरिक्त बेड उपलब्ध करण्यासाठी हलचाली सुरू केल्या आहेत. यासाठी विशेष पथकही तयार केलं आहे.