Popular News

जगभरात कोरोनाचं थैमान;वाढती रुग्णसंख्या चिंताजनक

२८ जून :- डोळ्यांना न दिसणाऱ्या जीवघेण्या कोरोना नावाच्या सूक्ष्म विषाणूने सर्व जगाला आपल्या तालावर नाचवले आहे.जिकडे पाहावं तिकडे फक्त कोरोनाचा कहर सुरु आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी प्रशासन आहोरात्र मेहनत घेत आहे.पण कोरोनाच थैमान आटोक्यात आणणे शक्य होत नाहीए. जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे एक कोटींहून अधिक रुग्ण झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण एक कोटी 74 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 5 लाखांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 54 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.