राजकारण

नरेंद्र मोदींनी चीनला दिला गर्भित इशारा!

२८ जून :-आज रविवार पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला.मोदी यावेळी म्हणाले की भारत संरक्षणक्षेत्रात पुढे जात आहे.आम्ही जे काही करतो, ती देशसेवाच असते. आपला देश सक्षम आणि स्वावलंबी बनणे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल. भारतमातेकडे डोळे वर करून पाहणाऱ्यांना उत्तर मिळाले आहे. वीरपुत्रांच्या त्यागाचा आम्हाला अभिमान आहेत. या वीरपुत्रांचे माता-पिता धन्य आहेत.लक्षात ठेवा भारत मैत्री करणे जाणतो आणि उत्तर देणे ही जाणतो अशा खडतर शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला गर्भित इशारा दिला.