प्रसुतीसाठी दाखल केलेल्या 6 माता कोरोनाची विळख्यात!
२८ जून :- कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस आटोक्याच्या बाहेर जात आहे. रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केलेल्या सहा मातांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय, यात वॉर्डमध्ये काम करणाऱ्या एका परिचारिकेला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. तर, 14 मातांना क्वॉरंटाईन करून ठेवत त्यांचे आणि बालकांचे देखील स्वॅब तपासणीकरता घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता या मातांचे आणि बालकांचे रिपोर्ट काय येतात? याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.