महाराष्ट्र

राज्यात कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद!

२७ जून :- राज्यात आजही कोरोनाचा कहर कायमच आहे.राज्यात आजही 5318 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 4 हजार 430 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.94 टक्के एवढं आहे. राज्यात आज 167 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 59 हजार 133 वर पोहोचली आहे. यापैकी 84 हजार 245 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 67 हजार 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!