भरदिवसा गळा चिरून व्यक्तीचा खून!
२७ जून – एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे माणसांची विकोपाला जात असणारी विक्षिप्त मनोवृत्ती.आणि यामुळेच सुरु असणारं हत्ये आणि आत्महत्येचं सत्र दिवसेंदिवस चिंताजनक होत चालले आहे. पुणे शहरात आज भरदिवसा वर्धमान सांस्कृतिक भवनाच्या समोर असलेल्या कालिदास जागडे मैदानात एक खून झाला आहे.दारू पिण्याच्या वादातून गळा चिरून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत प्रकाश खाजप्पा काणेकर हा कालिदास जागडे मैदानात सेक्युरिटी म्हणून काम करत होता. तेव्हा 2 व्यक्तींसोबत त्याचं दारूच्या कारणावरून भांडण झालं. नंतर हे भांडण विकोपाला गेलं आणि यातच प्रकाश काणेकर याचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी 2 संशियातांना ताब्यात घेतलं आहे.दोन्ही संशयित आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती आहे. या हत्येप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.