सुप्रियाताईंचा फडणवीसांना टोला!
२७ जुन -माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत करण्यात आलेल्या युती संदर्भात केलेल्या वक्तव्या संदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, टीका करणे हा त्यांचा अधिकार असून आमच्या सरकारमध्ये कुणालाही मनमोकळेपणे बोलण्याचा अधिकार आहे. तर, आमचं सरकार हे दडपशाहीच सरकार नसून विरोधकांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करावी, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मिश्किल टोला लगावला.