केंद्र सरकारने केली मोठी घोषणा!
27 जून : गलवान घाटीत नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या दोन सहकाऱ्यांना वाचवताना गुरुवारी वीर मरण आलेले जवान सचिन मोरे यांच्यावर त्यांच्या गावी मालेगावच्या साकोरी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सगळ्या नागरिकांनी जड अंतकरणाने त्यांचे अंत्यसंस्कार केले.केंद्र सरकारच्या वतीनं माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, खासदार डॉ सुभाष भामरे यांनीही शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहिली.यावेळी सुभाष भामरे यांनी शहीद सचिन मोरे यांच्या कुटुंबाला केंद्राकडून 1 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली. सचिन मोरे यांच्या पत्नीला सरकारी नौकरी तसंच त्याच्या तीनही मुलांचा शैक्षणिक सर्व खर्च सरकार करणार असल्याचं सुभाष भामरे यांनी सांगितलं.