दिल्ली कोरोनाची राजधानी!
27 जून : देशभरात सर्वत्रच कोरोनाचे थैमान सुरु आहे.कोरोनाच्या या काहारापासून देशाची राजधानी देखील वाचू शकली नाही. देशाची राजधानी दिल्लीमधील कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत आहे. शुक्रवारी येथे सर्वाधिक 3460 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये 24 तासांच्या आत या संसर्गामुळे 63 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनाची एकूण प्रकरणे वाढून 77,240 झाली आहेत. तर त्याच वेळी, कोविड – 19 संसर्गामुळे 2492 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या एकूण रूग्णांच्या बाबतीत दिल्लीने मुंबईला खूप मागे सोडले आहे.